मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळणार व्यासपीठ

By Admin | Updated: August 9, 2014 00:55 IST2014-08-09T00:55:16+5:302014-08-09T00:55:16+5:30

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर भरारी घेत आहे. मिक्ता अॅवॉर्डने ते सिद्धही केले आहे. आता पुन्हा मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर येण्यास सज्ज झाला आहे.

The Marathi Film will get the world-wide platform | मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळणार व्यासपीठ

मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळणार व्यासपीठ

>मुंबई : मराठी चित्रपट जागतिक स्तरावर भरारी घेत आहे. मिक्ता अॅवॉर्डने ते सिद्धही केले आहे. आता पुन्हा मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर येण्यास सज्ज झाला आहे. त्यासाठी इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अॅवॉर्ड्स  या  चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 2क् ते 24 सप्टेंबरदम्यान स्टार क्रूझवर हा सोहळा होणार आहे. 
स्टार क्रूझवर आयोजित करण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच सोहळा आहे. स्टार क्रूझवर हाँगकाँगमधून 2क् सप्टेंबर रोजी सोहळ्याची सुरुवात होणार असून नंतर चीन, व्हिएतनाम येथेही ती जाईल. पुरस्कार सोहळा 23 सप्टेंबरला असून 24 सप्टेंबरला क्रूझच्या हेलिपॅडवर रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रूझवर भारतीय कलाकारांसाठी जागतिक दर्जाचे आणखी काही उपक्रमही होणार आहेत. तसेच  जागतिक स्तरावरील प्रेक्षकांना मराठी चित्रपटातील संस्कृती आणि माहिती मिळावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. अभिनेते विजय पाटकर हे आयोजक मंडळाचे सदस्य असून दिग्दर्शक अमोल गुप्ते, रवी जाधव, महेश लिमये, संजय जाधव हे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.
मराठी चित्रपटांना त्यांचे टॅलेंट आणि तंत्रज्ञान दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना मराठी चित्रपटाबाबत जाणीव निर्माण 
करून देण्याची आमची इच्छा आहे.
आयएमएफएफए 2क्14मधून मराठी चित्रपटांना जगभरातील प्रेक्षकांर्पयत पोहोचवण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ दिले जाणार असल्याचे एएम एन्टरटेनमेंट अॅण्ड ब्रॉडकास्टिंगचे संचालक आणि कार्यक्रमाचे आयोजक चिंदबर रेगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The Marathi Film will get the world-wide platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.