मराठी-दलित मतांवर मदार

By Admin | Updated: October 4, 2014 01:28 IST2014-10-04T01:28:36+5:302014-10-04T01:28:36+5:30

शिवसेना, राष्ट्रवादीने दुबळे उमेदवार रिंगणात उतरविल्याने घाटकोपर पूर्व या मराठी-दलित मतांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपा-काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये खरी लढत होईल.

Marathi-Dalit votes | मराठी-दलित मतांवर मदार

मराठी-दलित मतांवर मदार

>जयेश शिरसाट ल्ल मुंबई
शिवसेना, राष्ट्रवादीने दुबळे उमेदवार रिंगणात उतरविल्याने घाटकोपर पूर्व या मराठी-दलित मतांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपा-काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये खरी लढत होईल. मोदींची लाट, सक्रिय झालेला संघ,  अन्य पक्षांतून मोठय़ा प्रमाणावर सुरू केलेल्या इनकमिंगमुळे लढतीआधीच भाजपाने काँग्रेसची प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी केल्याचे चित्र या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.
199क् पासून या मतदारसंघातून भाजपाचे प्रकाश मेहता सातत्याने निवडून आले. ते येथून सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. युती आघाडी फुटल्यामुळे खरे तर त्यांच्यासमोर चार पक्षांचे चार उमेदवार उभे ठाकतील. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसच्या प्रवीण छेडांचे त्यांना प्रखर आव्हान असेल.
कधी काळी या मतदारसंघावर गुजराती, जैन समाजाचे वर्चस्व होते. या एकगठ्ठ मतांच्या जीवावर मेहता निवडून येत होते. गेल्या वर्षी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि घाटकोपर पूर्वेकडील कामराजनगर, रमाबाई नगर आणि अन्य वस्त्या, झोपडपट्टय़ा जोडल्या गेल्या. आज येथील गारोडिया नगर, राजावाडी, 6क् फूट आणि 9क् फूट रोड परिसरात 2क् ते 25 टक्के गुजराती मतदार आहेत. पंतनगर, रमाबाई नगर, कामराज नगर, नित्यानंद नगर, लक्ष्मी नगर आणि अन्य झोपडपट्टय़ांमध्ये 6क् ते 65 टक्के मराठी-दलित मतदार राहतात. याच मराठी-दलित समीकरणावर गेल्या महापालिका लढतीत घाटकोपर पूर्वेतून मनसे व राष्ट्रवादी या प्रादेशिक 
पक्षांचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले.
युती तुटल्यानंतर येथील मराठी-दलित मतदारांच्या साथीने शिवसेनेला भाजपाचा हा बालेकिल्ला सर करण्याची संधी होती. तसेच मेहतांच्या राजकारणात जवळपास नामशेष झालेली स्थानिक संघटना आणि सैनिकांना पुन्हा संघटित करून बळ देता आले असते. मात्र प्रचाराचा नारळ फोडताना भाजपावर सडकून टीका करणारे, ‘आम्ही वाघ आहोत, लाट दाखवू’ अशा वल्गना करणा:या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेहतांसमोर जगदीश चौधरी या एका शाखाप्रमुखाला उभे केले.  
चौधरी मूळचे राष्ट्रवादीचे. महापालिका निवडणुकीत पडल्याने ते शिवसेनेत आले. संधी साधून शाखाप्रमुखही झाले. मुळात त्यांच्या उमेदवारीला शाखेतूनच विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील मराठी मते मनसे किंवा भाजपाकडे फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पाश्र्वभूमीवर मेहतांसमोर खरे आव्हान असेल ते त्यांच्याच समाजाचे, त्यांच्याच तालमीत तयार झालेले काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक छेडा यांचे. छेडा यांनी महापालिका निवडणुकीत भाजपाचा घाटकोपरमधील हुकुमी एक्का अशी ओळख असलेल्या भालचंद्र शिरसाट यांच्यावर विजय मिळवला होता. छेडांमुळे गुजराती मतांचे विभाजन होईल. मात्र मोदी लाट, संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना सक्रिय झाल्याने त्यातली छेडांच्या पारडय़ात कितपत मते पडतात हा औत्सुक्याचा विषय आहे. गुजराती मतांचे 
विभाजन झाल्यास या दोन्ही उमेदवारांची मदार मराठी-दलित मतांवर असेल. 
यातच भाजपाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र बक्षी, मनसेचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि व्यावसायिक राजा मिराणी यांना आपल्या तंबूत सहभागी करून घेतले आहे. गेल्या लढतीत बक्षी काँग्रेसतर्फे तर मिराणी अपक्ष म्हणून मेहतांसमोर उभे ठाकले होते. घाटकोपरमधील गुजराती, जैन व्यावसायिकांवरील जबरदस्त पकड असलेल्या मिराणी यांनी अपक्ष राहूनही तब्बल 15 हजार मते घेऊन मेहतांना घाम फोडला 
होता. मिराणींमुळेच मेहतांचे मताधिक्य घटले होते. मात्र आता मिराणी सोबत आल्याने ही मते भाजपाला पडू शकतील. परमेश्वर कदम यांनी गेल्या लढतीत उघडपणो मेहतांचा प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या येण्याने फारसा फरक पडणार नाही. बक्षींच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकत्र्यावर परिणाम होऊ शकेल. घाटकोपरचा विकास हा मुद्दा घेऊन छेडा यांनी प्रचारात घेतलेल्या मुसंडीमुळे भाजपाने सावध होत अशा प्रकारे मोर्चेबांधणी केल्याचे बोलले जाते.
 
च्मनसेने यंदा पुन्हा सतीश नारकर यांच्यावर मेहतांना थोपविण्याची जबाबदारी का दिली, हा प्रश्न मनसैनिकांना सतावतो आहे. गेल्या लढतीत राज ठाकरे यांच्या लाटेत मतदारसंघाबाहेरील नारकरांना तिस:या क्रमांकाची 26,323 मते पडली होती. यंदा ते कसा आणि किती प्रचार करतात, याकडेही सर्वाचे लक्ष असेल.
 
च्राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या राखी जाधव सलग दोन टर्म नगरसेविका आहेत. मात्र घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव, संघटना मजबूत नसल्याने जाधव मेहतांचे आव्हान कसे पेलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आघाडी स्वतंत्र झाल्याने जाधव जितकी मते घेतील तितका भाजपाच्या मेहतांचा फायदा होणार आहे.

Web Title: Marathi-Dalit votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.