Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवरची लाडकी आजी काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 09:38 IST

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आहे.

मुंबई : आपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे मुंबईत राहत्या घरी झोपेतच निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. 

आभाळमाया, काहे दिया परदेस या मालिकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. सध्या कलर्स वाहिनीवरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. त्यांच्या निधनाने मराठी मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :कलर्स मराठी