Join us  

Maratha Reservation : मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 4:06 PM

मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू झाला आहे. विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू झाला आहे. विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केलं आहे.

मुंबई - मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू झाला आहे. विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्याने हा कायदा आजपासून लागू झाला आहे. 

राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केलं आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. 1 डिसेंबर 2018 पासून मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू झाला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 1 डिसेंबरला जल्लोष करा हे आश्वासन प्रत्यक्षात आलं आहे. 

बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभ पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजुरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :मराठा आरक्षण