ब्लॅकमेल करून धारावीत विवाहितेवर बलात्कार
By Admin | Updated: June 30, 2014 01:37 IST2014-06-30T01:37:34+5:302014-06-30T01:37:34+5:30
महिलेचे ईल छायाचित्र काढून त्याआधारे ब्लॅकमेल करीत तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शाहूनगर पोलिसांनी महेश नाडर (3क्) या आरोपीला अटक केली आहे.

ब्लॅकमेल करून धारावीत विवाहितेवर बलात्कार
>मुंबई : महिलेचे ईल छायाचित्र काढून त्याआधारे ब्लॅकमेल करीत तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शाहूनगर पोलिसांनी महेश नाडर (3क्) या आरोपीला अटक केली आहे.
धारावीतील कुंभारवाडा परिसरात ही 22 वर्षीय पीडित महिला वर्षभरापासून दोन वर्षाची मुलगी आणि पतीसोबत राहत होती. याच परिसरात आरोपी नाडर राहत असून याच ठिकाणी त्याचे किराणा मालाचे दुकान आहे. अविवाहित असलेल्या या आरोपीने चार महिन्यांपूर्वी या पीडित महिलेला मोबाइलमधील काही व्हिडीओ दाखवले.
हे व्हिडीओ तुङोच असून माङयासोबत शरीरसंबंध ठेव अथवा सर्वाना हे व्हिडीओ दाखवेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानुसार त्याने या महिलेला त्याच्या घरी नेऊन अनेकदा तिच्यावर बलात्कार केले. काही दिवसांनी ही बाब तिच्या पतीला समजताच त्याने हा परिसर सोडून दुस:या परिसरात घर घेतले. मात्र, आरोपी त्या ठिकाणीही जाऊन या महिलेला ब्लॅकमेल करीत धमकावत होता. अनेकदा तो महिलेला रस्त्यातच गाठून तिला आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत असे. महिलेने ही बाब पुन्हा पतीला सांगितली आणि त्यानंतर त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, हा गुन्हा शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तो शाहूनगर पोलिसांकडे वर्ग केला. त्यानुसार, शाहूनगर पोलिसांनी काल रात्रीच आरोपीला त्याच्या घरातून अटक केली.
आरोपीने अशा प्रकारे परिसरातील 1क् ते 15 महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केले असून दहशतीपोटी या महिला तक्रारी करण्यास पुढे येत नसल्याचे या परिसरातील रहिवाशांकडून सांगण्यात येते. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)