लग्नसराईत पाणीटंचाईचे विघ्न

By Admin | Updated: May 14, 2015 22:57 IST2015-05-14T22:57:12+5:302015-05-14T22:57:12+5:30

ऐन लग्नसराईत वसई ग्रामीण परिसरात पाणीटंचाई सुरु आहे. महागाईचे संकट समोर असताना आता पाणीसमस्या निर्माण झाल्याने वधूवर पित्यासमोर नवा प्रश्न उभा आहे.

Maratha rain water shortage crisis | लग्नसराईत पाणीटंचाईचे विघ्न

लग्नसराईत पाणीटंचाईचे विघ्न

पारोळ : ऐन लग्नसराईत वसई ग्रामीण परिसरात पाणीटंचाई सुरु आहे. महागाईचे संकट समोर असताना आता पाणीसमस्या निर्माण झाल्याने वधूवर पित्यासमोर नवा प्रश्न उभा आहे.
सध्या ग्रामीण भागात लग्नाचा धूमधडाका आहे. शेतीकामातून मोकळे झाल्यानंतर शेतकरीवर्ग मे महिन्यात घरातील लग्नाचे बेत आखतो. यावर्षी वरूणराजाने परतीच्या वेळी पाठ फिरविल्याने आडणे, तिल्हेर, वडघर, आंबोडे, मेढे, माजीवली आदी गावांमध्ये टंचाई आहे. या गावात पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र विहिरी, बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्या बंद आहेत. (वार्ताहर)

Web Title: Maratha rain water shortage crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.