महावितरण नोकर भरतीविरोधात मराठा मोर्चाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:15 IST2020-12-03T04:15:20+5:302020-12-03T04:15:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महावितरण कंपनीने उपकेंद्र सहायक पदाकरिता सुरू केलेल्या भरतीप्रक्रियेविरोधात मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाने प्रकाशगड कार्यालयाबाहेर ...

महावितरण नोकर भरतीविरोधात मराठा मोर्चाचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरण कंपनीने उपकेंद्र सहायक पदाकरिता सुरू केलेल्या भरतीप्रक्रियेविरोधात मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाने प्रकाशगड कार्यालयाबाहेर मोर्चा काढला. मराठा आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना डावलून ही प्रक्रिया पार पाडली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आदेशापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांची पडताळणी सुरू असून फक्त काेरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झाल्यामुळे मराठा उमेदवारांचे प्रचंड नुकसान झाल्याचे निवेदन मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाशगड येथे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.