आरक्षण सोडतीत अनेकांची स्वपAे धुळीस
By Admin | Updated: November 13, 2014 22:54 IST2014-11-13T22:54:24+5:302014-11-13T22:54:24+5:30
ठाणो जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, वाडा, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या प्रमुख तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी सोडत पद्धतीने काढण्यात आल़े

आरक्षण सोडतीत अनेकांची स्वपAे धुळीस
ठाणो : ठाणो जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, वाडा, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या प्रमुख तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी सोडत पद्धतीने काढण्यात आल़े यात अनेक मातब्बर इच्छुकांचे गण महिला अथवा अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षित झाल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत़ (प्रतिनिधी)
अंबरनाथ पंचायत समितीच्या 1क् गणांची सोडत जाहीर
अंबरनाथ तालुक्यातील 1क् पंचायत समित्यांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून यात महिलांना 5क् टक्के आरक्षण आह़े सोडतीत मुळगाव, चिंचपाडा आणि नेवाळी गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर आडिवली, ढोकळी आणि चामटोली गण सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आह़े चरगाव गण अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवला असून आशेळे गण अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला. याव्यतिरिक्त मांगरूळ गण इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून माणोरे आणि वांगणी गण इतर मागासवर्गीय स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आह़े
चिमुरडीने काढली सोडत
अंबाडी : नव्या पुनर्रचनेनंतर ठाणो जिल्हय़ात सर्वात मोठय़ा व्यापक बनलेल्या बहुचर्चित भिवंडी पंचायत समितीच्या सर्व 34 गणांची आरक्षण सोडत गुरुवारी निवडणूक नियमावलीनुसार सोडत पद्धतीने जाहीर झाली. यात अनेक इच्छुक सर्वसाधारण उमेदवारांचे गण अनुसूचित जाती-जमाती व महिला राखीव झाल्याने त्यांचे पंचायत समिती लढविण्याचे स्वप्न भंगले आहे. भिवंडी तहसीलदार वैशाली लंभाते यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी सेतू कार्यालयात ही आरक्षण सोडत चिठ्ठय़ा टाकून तालुकाभरातील अनेक नागरिकांच्या उपस्थितीत एक लहान मुलीच्या हस्ते पार पडली.
4अनुसूचित जाती राखीव गण (एकूण 2 पैकी 1 स्त्री राखीव)
4शेलार (स्त्री) व काटई तर अनुसूचित जमाती राखीव गण (एकूण 7 पैकी 4 स्त्री राखीव) झाले आहेत़ यात कुहे-शिरोळे, अनगाव-गणोशपुरी मोहंडूळ-खारबाव व ङिाडके हे चार गण स्त्रीसाठी आरक्षित झाले आहेत़
4नागरिकांचा मागास प्रवर्ग गण (एकूण 9 पैकी 5 स्त्री राखीव असून यात
4महापोली, कवाड, कोन पूर्व, खोणी (उत्तर काल्हेर) व कारिवली हे गण महिलासांठी राखीव झाले आहेत़ तसेच सर्व साधारण गण (एकूण 16 पैकी 7 जागा स्त्री राखीव ठेवण्यात आले आहेत़
4माणकोली, कांबे, भादाणो, राहनाळ, दाभाड, रांजनोली, पिंपळास या जागा महिलांच्या वाटय़ाला गेल्या आहेत़ चावे, अंबाडी, अंजूर, वडूनवघर, सरवली, आमणो, खोणी (दक्षिण), पडघा व पूर्णा खुल्या आहेत़
4सदर आरक्षण सोडतीने आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून राजकीय आखाडा तापून विधानसभा निवडणुकीनंतर पुनश्च राजकीय धुळवड आता भिवंडी तालुक्यात पाहावयास मिळणार आहे.
कल्याण पंचायत समितीच्या 26 गणांची सोडत
वरपगाव/नांदिवली : कल्याण पंचायत समितीच्या 26 गणांची आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती 2, नागरिकांच्या मागास प्रवर्ग 7 आणि सर्वसाधारण 16 गणांचा समावेश आह़े यामध्ये प्रथम दोन जागांसाठीच्या प्रवर्गामध्ये एक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली. यामध्ये म्हारळ (ब) ही अनुसूचित जाती तर दहागाव अनुसूचित जमाती अशी सोडत निघाली. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये कांबा, गोळवली, विसवली (अ) निळजे, नांदिवली (अ) खडवली आणि पिसवली (ब) या गणांचा समावेश झाला असून सर्वसाधारणकरिता घोटसई, रायते, आजदे (अ) माणगाव, पिंपरी, नांदिवली, कोळे, भोपर, दावडी, सोनारपाडा, सागाव, हेदुटणो, फळेगाव, पिसवली (ब), आजदे (ब) नांदिवली (अ) या गणांचा समावेश करण्यात आला.
नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये 4 जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्यामध्ये चिठ्ठीद्वारे गोळवली, पिसवली (अ), निळजे आणि खडवली या गणांचा समावेश आहे. 16 गणांमधील 8 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये हेदुटणो, पिसवली (ब), दापडी, सागाव, सोनारपाडा, माणगाव, आजदे (ब) आणि फळेगाव या गणांमध्ये चिठ्ठीमुळे महिलांना संधी मिळणार आहे.
एकूण 26 पंचायत समिती गणांपैकी तब्बल 13 गणांमध्ये महिलांना संधी मिळणार असून सोडतीच्या वेळी अनेक ग्रामस्थांनी या सोडतीस आक्षेप घेतला. त्यामुळे या विरोधात जिल्हाधिकारी ठाणो यांच्याकडे तक्रारी करावी, असे प्रांताधिकारी धनंजय सावळसकर यांनी सांगितले. शिवाय, हे आरक्षण 2क्13 च्या जनगणनेनुसार केल्याचेही त्यांचे म्हणणो आहे. या वेळी तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, नायब तहसीलदार डॉ. कदम आदी अधिकारी उपस्थित होते.
मुरबाडमध्ये अनेकांच्या आशेवर पाणी
धसई/टोकावडे : मुरबाड तालुक्यातील पंचायत समितीचे एकूण 16 गण जाहीर झाले. त्या गणांचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी 7, अनुसुचित जमातीसाठी 4, अनु. जातीसाठी 1, व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 यासाठीचे आरक्षण हिराजी गोमाजी पाटील सभागृह जि.प. विश्रमगृह, मुरबाड येथे काढण्यात आले. त्यामध्ये माळ पं.स. गण अनु. जमाती स्त्री राखीव, वैशाखरे अनु. जमाती प्रवर्ग, टोकावडे सर्वसाधारण प्रवर्ग, सोनावळे अनु. जमाती प्रवर्ग, धसई ना. मागास प्रवर्ग स्त्री राखीव, देहरी ना. मागास प्रवर्ग स्त्री राखीव, सरळगाव सर्वसाधारण स्त्री राखीव, शिवळे सर्वसाधारण प्रवर्ग, पवाळे सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव, आसोळे सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव, मुरबाड सर्वसाधारण प्रवर्ग, देवगाव अनु. जाती प्रवर्ग, म्हसा अनु. जमाती स्त्री राखीव, नारिवली सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव आणि डोंगरन्हावे गण ना. मागास प्रवर्ग अशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले. डॉ. मोहन नळदकर (जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणो), मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के- पाटील, निवासी तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसीलदार अजय पाटील व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आदींसमोर सोडतीद्वारे काढण्यात आले.
शहापूरसाठी 24 निर्वाचन गण निश्चित
शहापूर /आसनगाव : शहापूर पंचायत समितीच्या निवडणुकीचे 24 निर्वाचन गण व आरक्षण अजरुननगर सभागृह येथे निश्चित करण्यात आले. यात शिरोळ आदिवासी महिला, खर्डी-मोखावणो आदिवासी, कसारा खु॥, डोळखांब आदिवासी महिला, गुंडे सर्वसाधारण महिला, साकडबाव आदिवासी महिला, वेहळोली आदिवासी, बिरवाडी आदिवासी महिला, टेंभा आदिवासी, शहापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, आवाळे आदिवासी, वासिंद (प.) आदिवासी महिला, वासिंद (पू.) अनुसूचित जाती महिला, आसनगाव सर्वसाधारण महिला, कळंभे, चेरपोली सर्वसाधारण, गोठेघर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नडगाव सर्वसाधारण, दहिवली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धसई सर्वसाधारण, असनोली सर्वसाधारण महिला, किन्हवली सर्वसाधारण, सावरोली सो. आदिवासी याप्रमाणो गण निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत, हरकती दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावर 2क् नोव्हेंबर्पयत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली.