विकासाचे अनेक प्रश्न प्रभागामध्ये प्रलंबित

By Admin | Updated: March 11, 2015 22:26 IST2015-03-11T22:26:04+5:302015-03-11T22:26:04+5:30

नालासोपारा शहराच्या पूर्वेस हा प्रभाग असून या प्रभागामध्ये गालानगर, शिर्डीनगर, संकेश्वरनगर, कृपानगर व ख्रिस्तराज परिसर या भागांचा समावेश आहे

Many questions of development are pending in the division | विकासाचे अनेक प्रश्न प्रभागामध्ये प्रलंबित

विकासाचे अनेक प्रश्न प्रभागामध्ये प्रलंबित

दिपक मोहिते, वसई
नालासोपारा शहराच्या पूर्वेस हा प्रभाग असून या प्रभागामध्ये गालानगर, शिर्डीनगर, संकेश्वरनगर, कृपानगर व ख्रिस्तराज परिसर या भागांचा समावेश आहे. अनधिकृत चाळींचा भरणा असलेल्या या प्रभागात ४ वर्षात ४ कोटींची विकासकामे केल्याचा दावा स्थानिक नगरसेवक पंडीत शांताराम पाटील यांनी केला असला तरी अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. या प्रभागामध्ये काही वर्षापूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे नागरीसुविधांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. दाटीवाटीने उभारण्यात आलेल्या इमारतीमुळे विकासकामे करतानाही अडचणींना तोंड द्यावे लागते.
बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे येथे पोटनिवडणुक झाली व पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीचेच पंडीत शांताराम पाटील हे निवडून आले. त्यांनी गेल्या ४ वर्षात रस्ते, गटारे व अन्य नागरीसुविधांची कामे केली. काही भागात शौचालयाची कामे मंजूर झाली असून ती लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भरमसाठ अनधिकृत बांधकामामुळे पाणीटंचाई या प्रभागात जाणवते. विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असते. अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्यांना उन्हाळ्यात अन्य पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. दररोज कचरा उचलला जातो असा दावा नगरसेवकाकडून होत असला तरी प्रभागाच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात.

Web Title: Many questions of development are pending in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.