घर देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

By Admin | Updated: December 29, 2014 02:35 IST2014-12-29T02:35:30+5:302014-12-29T02:35:30+5:30

घर देण्याच्या बहाण्याने पनवेलमध्ये फसवणूक झाली असून याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोन बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Many people cheated on the sigh of giving home | घर देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

घर देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

नवी मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने पनवेलमध्ये फसवणूक झाली असून याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोन बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर येथे राहणाऱ्या दीपक पांचाळ यांनी रो हाऊस खरेदीसाठी त्यांनी नवीन पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकाकडे डीडी व चेकमार्फत सुमारे ३ लाख ७९ हजार भरले होते. त्यांच्याशिवाय इतरही सुमारे ३० नागरिकांनी रो हाऊससाठी सदर बिल्डरकडे पैसे जमा केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार संबंधित बिल्डरने नागरिकांची ८० लाख ७९ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शशिकांत चौधरी व नितीन झेंडे यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Many people cheated on the sigh of giving home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.