डॉक्टरच्या जाळ्यात अनेक मुली
By Admin | Updated: September 8, 2014 01:58 IST2014-09-08T01:58:14+5:302014-09-08T01:58:14+5:30
मुलुंड कॉलनीत डॉ. खतिराचा आकांक्षा नर्सिंग होम नावाचा दुमजली दवाखाना आहे. हा डॉक्टर बीएचएमएस असून, गेल्या २५ वर्षांपासून याच ठिकाणी तो प्रॅक्टिस करतो.

डॉक्टरच्या जाळ्यात अनेक मुली
मुंबई : पोटदुखीची तक्रार घेऊन गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे नग्न फोटो काढून हे फोटो सोशल मीडियावर जाहीर करण्याची धमकी देत डॉ. जयेश खतिरा (४८) या नराधम डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना उघड झाली. हा बलात्कारी डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने यापूर्वीही अनेक मुलींवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने मुलुंड पोलिसांचा तपास आता सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
मुलुंड कॉलनीत डॉ. खतिराचा आकांक्षा नर्सिंग होम नावाचा दुमजली दवाखाना आहे. हा डॉक्टर बीएचएमएस असून, गेल्या २५ वर्षांपासून याच ठिकाणी तो प्रॅक्टिस करतो. शनिवारी डॉ. खतिरा यास अटक करण्यात आली. १२ तारखेपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्याने फोटो काढलेला मोबाइल, बलात्कारासाठी वापरलेली गाडी तसेच गुन्ह्यात वापरलेले व्हिजिटिंग कार्डही पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी या संदर्भात तक्र ारदार तरुणीच्या जबाबानुसार गुन्ह्याची नोंद केलेली आहे. पोलिसांनी सांगितले की, १ सप्टेंबरला पोटदुखीची तक्र ार घेऊन ती डॉ. खतिराकडे गेली. ती एकटीच असल्याची संधी साधत तपासणी करण्याच्या बहाण्याने खतिराने तिला कपडे काढण्यास सांगितले. पुढे तपासणीच्या बहाण्याने त्याने तिचे मोबाइलमध्ये फोटोही काढले. फोटो काढल्याचा संशय मुलीला होता, मात्र ती काही विचारणार तोच खतिराने तिला कम्पाउंडरकडे जाऊन औषध घेण्यास सांगितले. त्याचदरम्यान कम्पाउंडर तरु णीने पीडित मुलीला औषधाच्या गोळ््या देत डॉ. खतिराचे व्हिजिटिंग कार्ड देऊन औषध कसे घ्यायचे, याबाबत घरी गेल्यानंतर खतिराला कॉल करावयास सांगितला. घरी गेल्यानंतर औषधांची विचारणा करण्यासाठी कॉल केला असताना खतिराने तिचे नग्न फोटो घेतले असून, ते सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस कम्पाउंडर तरुणीकडेही अधिक चौकशी करणार आहेत. तसेच या नराधम डॉक्टरच्या नर्सिंग होममध्ये काम करीत असलेल्या कर्मचारी महिलांशीही त्याने गैरकृत्य केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून होणार आहे. नर्सिंग होममधील महिला कर्मचाऱ्यांचे जबाबही यामध्ये नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. नर्सिंग होमचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरीकडे तक्र ारदार अल्पवयीन मुलीचे आई-बाबा गावी राहत असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुलुंड कॉलनी येथे ती मावशीकडे राहते. त्याच परिसरात राहणारी तिची चुलत मावशी डॉ. खतिराच्या नर्सिंग होममध्ये कामाला होती. त्यावेळी मावशीला जेवणाचा डबा घेऊन पीडित मुलगी नर्सिंग होममध्ये याआधीही आली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या मावशीला कामावरून काढण्यात आले होते. (प्रतिनिधी)