मनोरच्या नागरिकांची पायपीट थांबणार
By Admin | Updated: May 7, 2015 00:17 IST2015-05-07T00:17:10+5:302015-05-07T00:17:10+5:30
नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली पायपीट आता कायमची थांबणार आहे. यासाठी नऊ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे.

मनोरच्या नागरिकांची पायपीट थांबणार
मनोर : येथील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली पायपीट आता कायमची थांबणार आहे. यासाठी नऊ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे.
वैतरणा नदीत पाणी अडविण्यासाठी व पाणी खारट होऊ नये यासाठी बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात केली आहे. तिथून पाईपलाईनद्वारे मनोर येथे सुरू असलेल्या टाकीत पाणी आणण्यात येणार आहे. दोन्ही कामे सुरु झाले आहे.
२०१४ मध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून काम बंद असल्याने ते सुरु करण्याची मागणी केली होती.(वार्ताहर)