मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतीगृहांची उभारणी करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

By मनोहर कुंभेजकर | Published: March 8, 2024 06:34 PM2024-03-08T18:34:06+5:302024-03-08T18:34:34+5:30

Mumbai: मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना सुरक्षित असे निवासाचे ठिकाण मिळणार असल्याने प्रगतीच्या संधी विस्तारतील. आगामी वर्षभरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत पाच वसतीगृहांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन उपनगराचे पालक मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी केले.

Mangalprabhat Lodha's announcement to build five hostels for working and business women in Mumbai | मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतीगृहांची उभारणी करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतीगृहांची उभारणी करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना सुरक्षित असे निवासाचे ठिकाण मिळणार असल्याने प्रगतीच्या संधी विस्तारतील. आगामी वर्षभरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत पाच वसतीगृहांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन उपनगराचे पालक मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त गोरेगाव (प.) पिरामल नगर येथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. 

मुंबई महानगरपालिका आणि परिवर्तन महिला संस्थेद्वारे नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी उभारलेल्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते झाले.स्थानिक  आ. विद्या ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबई महानगरात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे. येथील १६ मजली वसतिगृहामध्ये १८० महिलांच्या निवासाची सुविधा उपलब्ध आहे.

एकल महिला, विधवा, घटस्फोटित आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या वसतिगृहाचा लाभ मिळणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला मोठा हातभार लागणार आहे असेही ते म्हणाले.

Web Title: Mangalprabhat Lodha's announcement to build five hostels for working and business women in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.