मुंबई पालिकेच्या धर्तीवरच मंडपांना परवानगी

By Admin | Updated: October 6, 2015 02:45 IST2015-10-06T02:45:29+5:302015-10-06T02:45:29+5:30

ठाणे महापालिकेने मुुंबई महापालिकेच्या धोरणानुसारच रस्त्यावरील मंडप उभारल्याविरोधात कारवाई केली असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.

Mandap permissions on the basis of Mumbai Municipal Corporation | मुंबई पालिकेच्या धर्तीवरच मंडपांना परवानगी

मुंबई पालिकेच्या धर्तीवरच मंडपांना परवानगी

ठाणे : ठाणे महापालिकेने मुुंबई महापालिकेच्या धोरणानुसारच रस्त्यावरील मंडप उभारल्याविरोधात कारवाई केली असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या धोरणाला गोंधळात सूचनेसह मंजुरी दिली होती. परंतु हे धोरण मुंबई महापालिकेच्या धोरणाशी तंतोतंत जुळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या शहरातील ज्या मंडळांना नोटिसा बजावण्याची कारवाई केलेली आहे, ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आहे. परंतु पालिकेची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता मंडप उभारणाऱ्या ५४ मंडळांच्या विरोधात मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय ज्या मंडळांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या, त्यांनादेखील तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यांनी दंड अथवा त्यासंदर्भातील खुलासा केला नाही तर मात्र पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या मंडपांबाबत कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेने जे धोरण तयार केले होते, त्याची अंमलबजावणी केली नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Mandap permissions on the basis of Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.