महावितरणची तलासरीत मनमानी
By Admin | Updated: November 21, 2014 22:48 IST2014-11-21T22:48:11+5:302014-11-21T22:48:11+5:30
येथे सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालय, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा तसेच तलासरीला मोठी बाजारपेठ आहे.

महावितरणची तलासरीत मनमानी
तलासरी : येथे सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालय, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा तसेच तलासरीला मोठी बाजारपेठ आहे. परंतु तलासरी वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे तलासरीतील जनता व्यापारी तसेच शासकीय यंत्रणा हैराण झाली आहे.
तलासरीत वीज कंपनीच्या मनमानी कारभारामुळे रोज आठ आठ तासाचे अन्यायकारक वीजभारनियमन लादले जाते. भारनियमन नंतर लगेच वीजमंडळाच्या तांत्रीक दोषामुळे वीजपुरवठा खंडीत, कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे नागरीक व व्यापारी हैराण झाले असून व्यापारी संघटनेने तलासरी बंदचा इशारा दिला आहे.