बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याला अटक
By Admin | Updated: November 15, 2015 02:09 IST2015-11-15T02:09:44+5:302015-11-15T02:09:44+5:30
कांदिवली येथील सिनेमा गृहात बॉम्ब असल्याचे अफवा पसरविणाऱ्या मोहम्मद राहा मजहार शेख (२८) गुन्हे शाखेने अटक केली आहे.

बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याला अटक
मुंबई : कांदिवली येथील सिनेमा गृहात बॉम्ब असल्याचे अफवा पसरविणाऱ्या मोहम्मद राहा मजहार शेख (२८) गुन्हे शाखेने अटक केली आहे. दारुच्या नशेत त्याने गुरुवारी पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते.
कांदिवली पश्चिमेकडील मयुर सिनेमा गृहात बॉम्ब असल्याची माहिती दिली. या माहितीने पोलिसांनी मॉलची तपासणी केली. मात्र त्यामध्ये काहीही सापडले
नाही. तो कॉल शेखने केल्याचे तपासात समोर येताच गुन्हे शाखेने अट केली.
कांदिवलीत गणेश चौक परिसरात रहाणारा शेख हा मॅकेनिक आहे. गुरुवारी रात्री तो मयुर
सिनेमा गृहात भोजपुरी सिनेमा
पाहत होता. दारुच्या नशेत त्याने मजा म्हणून पोलिस नियंत्रण कक्षास
फोन करुन बॉम्बची असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)