नवऱ्याची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

By Admin | Updated: May 10, 2017 00:12 IST2017-05-10T00:12:00+5:302017-05-10T00:12:00+5:30

ओढणीने नवऱ्याचा गळा आवळून त्याची हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर ओढणीचे तुकडे करून ते कचऱ्यात फेकणाऱ्या

The man who killed his husband was arrested | नवऱ्याची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

नवऱ्याची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : ओढणीने नवऱ्याचा गळा आवळून त्याची हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर ओढणीचे तुकडे करून ते कचऱ्यात फेकणाऱ्या पत्नीला सहा दिवसांनी मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अलमास कॉलनी भागातील बी. एम. अपार्टमेन्टमध्ये रहाणारा मेहंदी सैय्यद याचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा करून पत्नी जहारा हिने त्याला खाजगी रु ग्णालयात नेले. नंतर दफनविधीपूर्वी कब्रस्तानात मृतदेहाला अंघोळ घालण्याची तयारी सुरु असताना गळ्याजवळील खुणा व्यवस्थापकाच्या लक्षात आल्या. त्याच्या सांगण्यावरु न नातेवाईकांनी पोलिसांना बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात पाठविला. तेथील डॉक्टरांनी त्याचा खून केल्याचा अहवाल दिला. त्या आधारे आणि मृताच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार जहारा हिला अटक केली.

Web Title: The man who killed his husband was arrested