बोरिवली येथे गोळीबार, एकाला अटक
By Admin | Updated: November 15, 2016 04:20 IST2016-11-15T04:20:28+5:302016-11-15T04:20:28+5:30
पूर्ववैमनस्यातून एका व्यायाम प्रशिक्षकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी बोरीवलीत घडली. यात कोणीही जखमी झाले नाही.

बोरिवली येथे गोळीबार, एकाला अटक
मुंबई : पूर्ववैमनस्यातून एका व्यायाम प्रशिक्षकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी बोरीवलीत घडली. यात कोणीही जखमी झाले नाही. कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
समशेर खान (२२) असे तक्रारदार व्यायाम प्रशिक्षकाचे नाव आहे. बोरीवली पूर्र्वेच्या दौलतनगर परिसरात राहणारे खान यांचे काही दिवसांपूर्वी एका इसमासोबत भांडण झाले
होते.
त्यात त्यांनी त्याला बेदम चोप दिला होता. याचा सूड घेण्यासाठी त्यांचा भाऊ कादर रहमान शेख (४०) उर्फ कादर बादशाह याने दौलतनगर परिसरात जाऊन खानवर गोळीबार केला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेखला अटक केली.
दहिसरच्या इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारा शेख हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर एमएचबी आणि दहिसर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)