Join us

"मुंबईत लवकरच ब्लास्ट करणार"; पोलिसांना ट्विटरवर मिळाली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:02 IST

22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने ट्विटरवर "मी लवकरच मुंबईत स्फोट करणार आहे," असा धमकीचा मेसेज पोस्ट करत मुंबई पोलिसांना धमकी दिली आहे.

मुंबई पोलिसांना ट्विटरवरून धमकी देण्यात आली आहे. लवकरच मुंबईमध्ये ब्लास्ट करणार असल्याचं या धमकीमध्ये म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने ट्विटरवर "मी लवकरच मुंबईत स्फोट करणार आहे," असा धमकीचा मेसेज पोस्ट करत मुंबई पोलिसांना धमकी दिली आहे.

पोलिसांनी संबंधित ट्विटर अकाऊंटची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सायबर सेलला याबाबत माहिती देण्यात आली असून हे ट्विटर अकाऊंट कोणाचं आहे?, कुठून ते अपडेत होत होतं? याचा शोध घेण्यात येत आहे. कॉल फेक आहे का? या संदर्भातील तपास देखील मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस