पुरुषाचा आरपीएफ महिला कर्मचारीवर हल्ला
By अनिकेत घमंडी | Updated: October 26, 2023 21:31 IST2023-10-26T21:30:55+5:302023-10-26T21:31:36+5:30
डोंबिवली : सिएसएमटी वरून गुरुवारी संध्याकाळी ६:२८ वाजता कसारा ट्रेन मध्ये कसारा दिशेने महिला सेकंड क्लास डब्यामध्ये वांशिद स्टेशनवर ...

पुरुषाचा आरपीएफ महिला कर्मचारीवर हल्ला
डोंबिवली: सिएसएमटी वरून गुरुवारी संध्याकाळी ६:२८ वाजता कसारा ट्रेन मध्ये कसारा दिशेने महिला सेकंड क्लास डब्यामध्ये वांशिद स्टेशनवर एक पुरुष चढला. त्याला डब्यातील आरपीएफ महिला कर्मचारीने खाली उतरायला सांगितले म्हणून त्याने आरपीएफ कर्मचारी ला मारल्याची घटना घडल्याची माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या की मारहाण होत असताना दुर्दैव म्हणजे त्या डब्यातील महिला बघत होत्या.एक महिला पुढे आली पण तीला देखील त्याने मारहाण केली त्यामुळे तीच्या हाताला दुखापत झाली. हा प्रकार आसनगांव स्टेशन येईपर्यंत सुरू होता. आसनगांव फलाटावर त्या पुरुषाला आरपीएफ कर्मचारीने ढकलले तेंव्हा तो खाली पडला आणि पळून गेला, असे त्या ट्रेन मधील प्रत्यक्ष दर्शी महिलांनी सांगितले आहे.
या ग्रुपमधील आरपीएफ वरिष्ठ अधिकारी यांना नम्र विनंती आहे की सदर दुर्दैवी घटनेची तात्काळ दखल घ्यावी व संबंधित पुरुषांवर कारवाई करुन या ग्रुपमध्ये माहिती द्यावी. कारण आरपीएफ महिला कर्मचारी यांचेवर अशा पध्दतीने हल्ला होत असेल तर सर्व सामान्य महिलांच्या सुरक्षितता कशी राहील असा सवाल अरगडे यांनी।केला.