Join us
Daily Top 2Weekly Top 5

माॅल्सची केली झाडाझडती अग्निशमन दलाचा दणका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:29 IST

अग्निशमन दलाचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्ग राेखण्यासाठी लागू केलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असून, मुंबई बऱ्यापैकी पूर्वपदावर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील मॉल्सही खुले झाले असून, बहुतांश मॉल्सची तपासणी, पाहणी मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली. या मॉल्सला सूचनांचे पालन करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. 

माॅल्समध्ये अग्निसुरक्षा महत्त्वाची आहे. नियम पाळले गेले नाहीत अथवा अनधिकृत बांधकाम उभारल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय सहायक आयुक्तांना आहेत, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी दिली. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या यादीनुसार, ज्या मॉल्सची पाहणी करण्यात आली आहे त्या मॉल्समध्ये सध्या तरी २९ मॉल्सचा समावेश आहे.

नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलला लागलेल्‍या आगीनंतर मुंबईतील सर्व मॉलच्‍या अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी करण्‍याचे निर्देश स्‍थायी समितीच्‍या बैठकीत स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव यांनी अग्निशमन दलाला दिले होते. त्‍यानुसार अग्निशमन दलाने ६९ मॉलची तपासणी केली असून २९ मॉलने अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता न केल्‍याने त्‍यांना नोटीस बजाविण्‍यात आली आहे.

या माॅल्सची पाहणी नरिमन पॉइंट - सीआर २, मुंबई सेंट्रल - सिटी सेंटर, दादर - नक्षत्र, जुहू - डी.बी, सांताक्रुझ - रिलायन्स रिटेल लिमिटेड, मिलन मॉल गारमेंट हब, फाय लाईफ प्रिमायसेस, खार - केनिल वर्थ शॉपिंग सेंटर, वांद्रे - रिलायन्स ट्रेंडस मेन स्ट्रीट, ग्लोबस, सुबुरबिया, बोरीवली - दी झोन मॉल, गोकुळ शॉपिंग सेंटर, गोकुळ शॉपिंग आर्केड, रिलायन्स मॉल, कांदिवली - टेन्थ सेंट्रल मॉल, दहिसर - देवराज, साईकृपा, मालाड - सेंट्रल प्लाझा, इस्टर्न प्लाझा, दी मॉल, कांदिवली - अ‍ॅनेक्स, विष्णू शिवम मॉल, ठाकूर मूव्ही अँड शॉपिंग मॉल, ग्रोवर अँड वेल, चेंबूर - के स्टार मॉल, क्युबिक मॉल, पवई - हायको मॉल, भांडुप - ड्रीम्स.

सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर n अनेक मॉल्समध्‍ये अनधिकृत कामे झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला  होता.n समितीच्‍या बैठकीत आगीचे पडसाद उमटल्‍यानंतर मॉल्‍सबाबत पालिकेने लक्ष केंद्रित केले. मॉलची तपासणी करताना मॉलमध्‍ये नेमके काय बदल करण्‍यात आले आहेत.n अग्निरोधक यंत्रणा कार्यरत आहे की नाही ?n या सर्व बाबी तपासात पुढे आणण्‍याचे निर्देश अग्निशमन दलाला दिले होते.

टॅग्स :अग्निशमन दल