विद्यार्थ्यांची ‘मल्हार’वारी
By Admin | Updated: August 12, 2015 03:52 IST2015-08-12T03:52:23+5:302015-08-12T03:52:23+5:30
महाविद्यालयीन वयात ‘मल्हार’ म्हणजे तरुणाईच्या गळ््यातील ताईतच जणू. सध्या एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या युथ महोत्सवाची तयारी जोशात सुरु असताना दुसऱ्या बाजूला झेवियर्स

विद्यार्थ्यांची ‘मल्हार’वारी
- महेश चेमटे, मुंबई
महाविद्यालयीन वयात ‘मल्हार’ म्हणजे तरुणाईच्या गळ््यातील ताईतच जणू. सध्या एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या युथ महोत्सवाची तयारी जोशात सुरु असताना दुसऱ्या बाजूला झेवियर्स महाविद्यालयातही ‘मल्हार’मध्ये विविध उपक्रम सुरु आहेत.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मल्हार फेस्टीव्हलची तयारी मे महिन्यापासून सुरु होते. मार्केटिंग, पब्लिक रिलेशन, सिक्युरिटी, प्रोटोकॉल यांसारख्या २१ टीम मल्हार महोत्सवाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळत आहेत. या टीममधील १३०० विद्यार्थी सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांसाठी मदत करतात. मल्हारमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे सुरेख मिश्रण बघायला मिळणार आहे.
यंदा मल्हार मध्ये ४५ इव्हेंट आहेत. विद्यार्थ्यांच्या शरीरासोबत मेंदुला चालना अशी शक्कल मल्हारच्या टीमने लढविली आहे. मल्हारच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये फ्यूजन डान्स, लीप सिंक, कठपुतली के राज यांनी आपले वेगळेपण जपले. भारताची प्राचीन लोकसंस्कृती जपण्यासाठी ‘फोक स्ट्रोक’ मध्ये तरुणाईं बेधुंदपणे थिरकताना दिसली. ३ ते ५ मिनिटांची प्राथमिक फेरी आणि ६ ते ८ मिनिटांची अंतिम फेरी अशा स्वरुपात ही स्पर्धा पार पडणार आहे. प्राथमिक फेरीत महाराष्ट्राच्या लेझीमसह, हिमाचल प्रदेशचा पंगी, मणिपुरी, डांगी, कुपारी, हरीयाणवी ,गरबा या लोकनृत्यानी वातावरणात लोकसंस्कृ तीचे रंग उधळले. प्राथमिक फेऱ्यांचे परीक्षण लोकनृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलार आणि लावणी दिग्दर्शिका आणि नृत्यांगना दिपाली विचारे यांनी केले. लोकनृत्याच्या स्पर्धेत ९ महाविद्यालयांनी अंतिम फेरीत धडक मारली. यात जय हिंद, झेविअर्स, सिद्धार्थ कॉलेज आॅफ लॉ अणि रामनारायण रुईया ही महाविद्यालये अग्रेसर होती.
लोकनृत्यच सरस
आज महाविद्यालयीन तरुणाईमध्ये लोकसंस्कृती, लोकनृत्याचे महत्त्व काहीसे कमी झाले आहे. मल्हार सारख्या महाविद्यालयीन तर महाराष्ट्र उत्सव राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. आज भारतात ४४० प्रकारचे लोकनृत्य आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन स्तरावर शिकून लोकनृत्यामध्ये देखील चांगल्या करिअरची संधी आहे. एकीकडे बॉलीवूड डान्सर दुसरीकडे लोकनृत्य डान्सर उभे केले असता. लोकनृत्यातील डान्सर नेहमीच उजवे ठरतील.
- देवेंद्र शेलार,
लोकनृत्य, दिग्दर्शक