Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरात मुंबईत मलेरिया टॉपवर; डासांपासून सावध राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 11:40 IST

शहरात मलेरियासोबत डेंग्यूचे रुग्णसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जर आजूबाजूच्या परिसरात काही पाण्याचे डबके निर्माण झाले असतील तर ते वेळीच नष्ट केले पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसात पावसाळ्याचे रुग्ण शहरात वाढत असून त्यामध्ये गॅस्ट्रो आजाराची संख्या वाढत होती. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळी आजारासंदर्भात दिलेल्या आकडेवारीत मलेरिया आजाराचे रुग्ण आठवड्याभरात वाढल्याचे  दिसून येत आहे. त्यामुळे आता डासांच्या या आजाराने डोके वर काढले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

शहरात मलेरियासोबत डेंग्यूचे रुग्णसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जर आजूबाजूच्या परिसरात काही पाण्याचे डबके निर्माण झाले असतील तर ते वेळीच नष्ट केले पाहिजे. तसेच डासांची संख्या वाढली असेल तर धूर फवारणी करून घ्यावी. ज्या पद्धतीने डासांपासून होणाऱ्या आजाराची संख्याच वाढत आहे, त्यामुळे येत्या काळात हे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आठवड्याभरातील रुग्णांची संख्या मलेरिया    २२६ लेप्टो    ७५ डेंग्यू    १५७ गॅस्ट्रो    २०३ हेपेटायटिस    ६ चिकनगुनिया    ९ स्वाईन फ्लू    ५६