Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला सेक्ससाठी ब्लॅकमेल करणा-या रिक्षाचालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:36 IST

विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला सेक्ससाठी ब्लॅकमेल करणा-या रिक्षाचालकाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे पीडित महिलेने जेव्हा आरोपीच्या मागण्या धुडकावून लावण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने महिलेच्या पतीला तो व्हिडीओ पाठवून दिला. पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली तेव्हा ती पूर्णपणे कोसळून पडलेली होती.

मुंबई, दि. 18 - विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला सेक्ससाठी ब्लॅकमेल करणा-या रिक्षाचालकाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रिक्षाचालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलेने जेव्हा आरोपीच्या मागण्या धुडकावून लावण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने महिलेच्या पतीला तो व्हिडीओ पाठवून दिला. आरोपी सरताज शेख विरोधात आयपीसीच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली तेव्हा ती पूर्णपणे कोसळून पडलेली होती. आपला संसार मोडणार या भितीने ती महिला भेदरली होती. महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आम्ही सरताज शेखला तात्काळ अटक केली अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली. आरोपी शेख 27 वर्षांचा असून पीडित महिला 26 वर्षांची आहे. मागच्या दोन वर्षांपासून दोघे परस्परांना ओळखत होते. 

एका कंपनीत दोघे एकत्र नोकरीला होते. शेखने नोकरी सोडल्यानंतर रिक्षा चालवायला सुरुवात केली. पीडित महिलेकडे स्वत:च्या मालकीची रिक्षा होती. शेखने तिच्याकडून ती रिक्षा भाडयावर चालवायला घेतली होती. तीन महिन्यापूर्वी आरोपी सरताज शेखने पीडित महिलेला फोन करुन रिक्षाच्या काही भागांचे नुकसान झाल्याचे तिला सांगितले. 

मला तुझ्या मदतीची गरज आहे असे सांगून त्याने पीडित महिलेला बोलावून घेतले.  सरताजला ओळखत असल्यामुळे तिच्या मनात सुद्धा कुठलाही संशय आला नाही. ती सांगितलेल्या पत्त्यावर सरताजला भेटायला गेली. त्यावेळी सरताजने गुंगीचे औषध मिसळून तिला कोल्डड्रींक प्यायला दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर शेखने तिचा अश्लील व्हिडीओ बनवला

पीडित महिलेला हा व्हिडीओ दाखवून त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. माझ्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर हा व्हिडीओ सार्वजनिक करीन अशी धमकी देण्यास त्याने सुरुवात केली. शेखने दोनवेळा पीडित महिलेला वेगवेगळया हॉटेलवर बोलावले व तिथे तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडित महिलेने त्याच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला तेव्हा शेखने तो व्हिडीओ सार्वजनिक केला व तिच्या पतीलाही पाठवला. त्यानंतर पीडित महिलेने पोलीसात धाव घेतली. आता शेख विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो पोलिसांच्या अटकेत आहे. 

टॅग्स :बलात्कार