अॅम्ब्युलन्सला मार्ग करून द्या!
By Admin | Updated: September 19, 2014 03:12 IST2014-09-19T03:12:09+5:302014-09-19T03:12:09+5:30
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, अॅम्ब्युलन्समधीलन रुग्णांना याचा मोठा फटका बसतो.

अॅम्ब्युलन्सला मार्ग करून द्या!
मुंबई : शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, अॅम्ब्युलन्समधीलन रुग्णांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे प्रथम ‘अॅम्ब्युलन्सला मार्ग करून द्या’ असे आवाहन वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवी संघटनेमार्फत केले जात आहे. यासाठी ‘सेव्ह लाइफ गिव्ह वे टू अॅम्ब्युलन्स’ असा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी वरळीतील नेहरू सेंटर येथे वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमाद्वारे केली जाणार आहे.
अपघात किंवा आजारपणामुळे गंभीर जखमी किंवा आजारी असलेल्या रुग्णावर उपचारासाठी रुग्णालयात जात असताना वाहतूक कोंडीमुळे प्राणास मुकण्याची शक्यता असते. वांद्रे येथे राहणा:या एका 21वर्षीय मुलीवर चेन्नईतील रुग्णालयात उपचार केले जाणार होते. रुग्णवाहिकेतून या मुलीला नेत असल्याने चेन्नईतील एअरपोर्टपासून रुग्णालयात जाण्यार्पयतचा मार्ग वाहतूक पोलिसांनी मोकळा करून दिला आणि अवघ्या बारा ते चौदा मिनिटांत ती रुग्णालयात पोहोचली. त्यामुळे योग्य उपचार झाल्याने त्या मुलीचे प्राणही वाचले. यात चेन्नईतील वाहन चालकांनीही वाहतुकीचे नियम पाळल्याने तेथील वाहतूक पोलिसांना साथ मिळाली. हे पाहता मुंबई वाहतूक पोलीस, वाहतूक विभाग आणि राधे स्वयंसेवी संघटना आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स यांच्या वतीने ‘सेव्ह लाइफ गिव्ह वे टू अॅम्ब्युलन्स’ असा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे जनजागृती करत मुंबई शहर आणि उपनगरात चार दिवस रॅलींचे आयोजन केले जाणार असल्याचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी वरळीतील नेहरू सेंटर येथे एका कार्यक्रमाद्वारे होणार असून मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया, अभिनेत्री राणी मुखर्जी आदी उपस्थित राहतील. त्यानंतर चार दिवस मुंबईत हा उपक्रम राबविला जाईल. (प्रतिनिधी)
च्तातडीने उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना घेऊन जाणा:या अॅम्ब्युलन्स चालकांनी किंवा रुग्णांच्या नातेवाइकांनी हेल्पलाइन क्रमांक 108 वरून वाहतूक पोलिसांना संदेश देताच उपस्थित वाहतूक पोलीस त्या ठिकाणाची आणि वाहनाची माहिती घेऊन मार्गावरील सिग्नल फ्री करून रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देतील.
च्संबंधित विभागातील वाहतूक रायडर हे रुग्णवाहिकेच्या पुढे राहून मार्ग मोकळा करून देण्यात मदत करतील.
च्जंक्शनवरील पोलीस अंमलदार हे इतर वाहने डाव्या बाजूला घेऊन उजवी बाजू रिकामी करून देण्यास मदत करतील. रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचेर्पयत नियंत्रण कक्षामार्फत त्यावर लक्ष ठेवण्यात येईल.