Join us

गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना, वर्सोवा येथे पाच मुले बुडाली, दोघे सापडले, तिघे बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 00:08 IST

Mumbai News: अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईतील वर्सोवा गाव येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे गणपती विसर्जन करताना पाच मुले समुद्रात बुडाली. यामधील दोन मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले.

मुंबई - अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईतील वर्सोवा गाव येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे गणपती विसर्जन करताना पाच मुले समुद्रात बुडाली. यामधील दोन मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. मात्र तीन मुले अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.दरम्यान, वाचवण्यात आलेल्या मुलांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी दुर्घटनास्थळ आणि आसपासच्या समुद्रात शोधमोहीम राबवली जात आहे. त्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. 

टॅग्स :मुंबईगणेश विसर्जन