माजिदच्या इंटरनेट कॉलचा तपशीललवकरच मिळणार
By Admin | Updated: January 10, 2015 02:08 IST2015-01-10T02:08:34+5:302015-01-10T02:08:34+5:30
इसिस या अतिरेकी संघटनेत सहभागी झालेल्या कल्याण येथील अरीब माजिद याने इंटरनेट कॉलद्वारे केलेल्या संवादाचा तपशील घेण्यास विशेष न्यायालयाने एनआयएला शुक्रवारी परवानगी दिली.

माजिदच्या इंटरनेट कॉलचा तपशीललवकरच मिळणार
मुंबई : इसिस या अतिरेकी संघटनेत सहभागी झालेल्या कल्याण येथील अरीब माजिद याने इंटरनेट कॉलद्वारे केलेल्या संवादाचा तपशील घेण्यास विशेष न्यायालयाने एनआयएला शुक्रवारी परवानगी दिली.
स्काईप व टाँगो या दोन परदेशी कंपन्यांच्या इंटरनेट कॉलद्वारे अरीबने संवाद साधला होता. याचा तपशील मिळाल्यास तो कोणाकोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे या कंपन्यांकडे याचा तपशील मागण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एनआयएने अर्जात केली
होती. ती न्यायालयाने मान्य
केली.
कल्याण येथील माजिद धार्मिक यात्रेसाठी मे महिन्यात इराकला गेला होता. तो तेथून परतलाच नाही. काही दिवसांनी तो अतिरेकी संघटनेत सहभागी झाल्याचे वृत्त आले. मात्र त्याला ताब्यात घेण्यात एनआयएला यश आले. सध्या अरीब न्यायालयीन कोठडीत आहे. (प्रतिनिधी)