अभिनेत्याच्या घरात मोलकरणीचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:08 IST2021-08-14T04:08:48+5:302021-08-14T04:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: भोजपुरी अभिनेते विनय आनंद यांच्या घरी मोलकरणीने डल्ला टाकत लाखोंचे दागिने लंपास केले. या प्रकरणी ...

The maid's house in the actor's house | अभिनेत्याच्या घरात मोलकरणीचा डल्ला

अभिनेत्याच्या घरात मोलकरणीचा डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: भोजपुरी अभिनेते विनय आनंद यांच्या घरी मोलकरणीने डल्ला टाकत लाखोंचे दागिने लंपास केले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तिला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

अनिता पुरी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती आनंद यांच्या अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील घरी घरकाम करायला यायची.

आनंद यांच्या पत्नी ज्योती या घरी दहा ते सहाच्या दरम्यान ऑफिसच्या कामात व्यस्त असायच्या. त्यांनीच ओशिवरा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना लग्नात भेट म्हणून मिळालेले दागिने त्यांनी कपाटात ठेवले होते, जे अचानक तिथून गायब झाले. याबाबत त्यांनी पती आनंद यांना विचारले असता, त्यांना काहीच कल्पना नव्हती. अखेर याबाबत अनिता पुरीकडे चौकशी केली असता, तिनेही याबाबत नकार दिला. पोलिसांनी अनिता हिची चौकशी करत तिला अटक केली. मात्र, अद्याप त्यांचे साडेचार लाखांचे दागिने अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाहीत.

Web Title: The maid's house in the actor's house