विमानात नवविवाहितेचा विनयभंग
By Admin | Updated: July 7, 2017 03:49 IST2017-07-07T03:49:50+5:302017-07-07T03:49:50+5:30
विमानात नवविवाहितेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी मुंबई विमानतळावर घडली. या प्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी विनयभंगाच्या

विमानात नवविवाहितेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विमानात नवविवाहितेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी मुंबई विमानतळावर घडली. या प्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात मालेगावच्या दोन व्यावसायिकांना बेड्या ठोकल्या.
अर्शद अहमद मोहम्मद (३६) आणि फैजान फारुख (३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार २८ वर्षांची महिला विमानाने दिल्लीहून मंगळवारी मुंबईत येत होती. फ्लाईट लॅण्ड होण्याच्या काही मिनिटे आधी विमानातील दिवे मंद करण्यात आले. त्याचा फायदा घेत दोघांपैकी एकाने या महिलेला अश्लील स्पर्श केला.