पंचायतीवर महिलाराज

By Admin | Updated: September 14, 2014 23:12 IST2014-09-14T23:12:41+5:302014-09-14T23:12:41+5:30

पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापती व उपसभापती पदावर महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी घेवून पंचायत समितीवर महिलाराज आणून दाखवले

Mahilaraj Panchayat | पंचायतीवर महिलाराज

पंचायतीवर महिलाराज

पेण : पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापती व उपसभापती पदावर महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी घेवून पंचायत समितीवर महिलाराज आणून दाखवले. पेण पंचायत समितीच्या सभापती पदावर दर्शना यशवंत म्हात्रे तर उपसभापती पदावर अपर्णा अनिल खामकर यांची बिनविरोध निवड झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची सहानुभूती मिळविण्याचा यशस्वी प्रयोग केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शासनाच्या नियमानुसार पं. स. सभापती, उपसभापती पदांच्या पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आज निवडणूक झाली. पेण पं.स. च्या एकूण १० सदस्यांपैकी ७ सदस्य शेकापचे असल्याने शेकापचेच निर्विवाद वर्चस्व होते. त्या अनुषंगाने सभापतीपदासाठी दर्शना म्हात्रे तर उपसभापतीपदासाठी अपर्णा खामकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाकडून अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे उघड झाले. निवडणूक पिठासीन अधिकारी तथा पेण तहसीलदार सुकेशिनी पगारे यांनी दुपारी विशेष सभेत सभापती म्हणून दर्शना म्हात्रे तर उपसभापती म्हणून अपर्णा अनिल खामकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच शेकाप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
याप्रसंगी आ. धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन करताना महिलांनाही आता हक्क मिळाल्याचे सिध्द झाल्याचे सांगितले. याप्रसंगी शेकाप चिटणीस किसनराव घरत, ज्येष्ठ नेते दिनेशशेठ पाटील, महादेव दिवेकर, मोहिनी दिवेकर, झेडपी सदस्य डी. बी. पाटील, संजय भोईर, बाळाराम पाटील, जयप्रकाश ठाकूर, भास्कर पाटील, यशवंत म्हात्रे, अनिल खामकर, बापू दळवी,
मंगेश दळवी, स्वप्नील म्हात्रे, कमलाकर ठाकूर, प्रमोद म्हात्रे यांच्यासह सभापती दर्शना म्हात्रे यांच्यासह आमटेम विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Mahilaraj Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.