घणसोली, कोपरखैरणे विभागात महिलाराज
By Admin | Updated: February 8, 2015 00:38 IST2015-02-08T00:38:36+5:302015-02-08T00:38:36+5:30
शनिवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक विभागांमध्ये महिलाराज येणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणात घणसोली व कोपरखैरणे विभागात सर्वाधिक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
घणसोली, कोपरखैरणे विभागात महिलाराज
सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
शनिवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक विभागांमध्ये महिलाराज येणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणात घणसोली व कोपरखैरणे विभागात सर्वाधिक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. त्याकरिता प्रभागांचे आरक्षण व सोडत शनिवारी झाली असता त्यात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यानुसार एकूण १११ प्रभागांपैकी ५६ प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र महिलांसाठी असलेले हे आरक्षण अनेक प्रभागांमध्ये सलग आल्याने तेथे महिलाराज येणार आहे. घणसोली विभागात ६ पैकी ५ प्रभाग (३१, ३३, ३४, ३५, ३६) महिलांना आरक्षित झालेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये इच्छुक असलेल्या सर्वपक्षीय पुरुषांच्या पदरी निराशा पडली आहे. तर विद्यमान नगसेवक संजय पाटील यांना देखील निवडणुकीच्या मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. उर्वरित एका (३२) प्रभागावर मागासवर्गीय प्रवर्गात खुले आरक्षण झाल्याने केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुषालाच तेथे संधी मिळणार आहे. घणसोली येथील सध्याच्या २५ क्रमांकाच्या प्रभागाची गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकसंख्यावाढ झाली आहे. त्यानुसार या एका प्रभागाचे नवे चार प्रभाग झाले आहे. त्यामध्ये घरोंदा व सिंप्लेक्स वसाहतीचे स्वतंत्र दोन प्रभाग झाले असून दोन्ही प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
माथाडी कामगारांची लोकवस्ती असलेल्या सिंप्लेक्सच्या प्रभागात मागासवर्गीय महिला आरक्षण झाल्याने अनेकांची उदासिनता झाली आहे.
च्महिलाराजमुळे कोपर खैरणे विभागातही विद्यमान नगरसेवकांना झटका बसला आहे.विभागातील १७ पैकी ११ प्रभागांवर महिला आहेत.
च्तर ३ प्रभाग अनआरक्षित व उर्वरित ३ प्रभाग मागासवर्गीय प्रवर्गासाठी खुले राहिले आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवक शंकर मोरे, सुरेश सालदार, रविकांत पाटील यांना पर्यायी प्रभागाचा शोधावा लागेल.