महेश झगडे यांच्यासह प्रशासकीय अधिका:यांच्या बदल्या
By Admin | Updated: August 6, 2014 02:44 IST2014-08-06T02:44:52+5:302014-08-06T02:44:52+5:30
राज्यातील हजारो औषध दुकानदारांचा रोष ओढवून घेतलेले अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांची अखेर आज राज्य शासनाने बदली केली

महेश झगडे यांच्यासह प्रशासकीय अधिका:यांच्या बदल्या
मुंबई : राज्यातील हजारो औषध दुकानदारांचा रोष ओढवून घेतलेले अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांची अखेर आज राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी पुरुषोत्तम भापकर हे नवे आयुक्त असतील. झगडे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागात त्यांनी दरारा निर्माण केला होता.
प्रशासकीय सेवेतील आणखी काही अधिका:यांच्या बदल्यांचे आदेश आज काढण्यात आले असून, डी.एस. ढोक-राजूरकर यांची अमरावतीच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतार्पयत ते आयुक्त (अपंग पुनर्वसन) होते. पुणो महापालिकेचे आयुक्त व्ही.व्ही. देशमुख हे पुण्याचे नवे विभागीय आयुक्त असतील. देशमुख आधी पुण्याचे जिल्हाधिकारीही होते. एकाच ठिकाणी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त, असे वतरूळ त्यांनी पूर्ण केले आहे.
मंत्रलयात पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव असलेले किरणकुमार गीते यांची बदली अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. याआधीचे जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांची गेल्या आठवडय़ात यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व्ही.एन. सूर्यवंशी याच पदावर नव्या पालघर जिल्हा परिषदेत बदलून गेले आहेत. अविनाश सुभेदार हे कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यपालन अधिकारी असतील. याआधी ते कोकण विभागीय जातपडताळणी समितीचे अध्यक्ष होते.
(विशेष प्रतिनिधी)