Join us

99 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 20:25 IST

९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई- ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे.  नागपूरकरांच्या आग्रहास्तव एलकुंचवार यांनी आयोजकांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारले आहे. प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आणि उद्घाटक वैदर्भीय असा योग यानिमित्ताने जुळून आला आहे.येत्या २२ फेब्रुवारीपासून हे चार दिवसीय संमेलन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ३३ वर्षांनंतर नागपूरला नाट्यसंमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.महेश एलकुंचवार यांनी या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करावे, अशी सर्व रंगकर्मींची इच्छा होती. एलकुंचवार यांना आम्ही तशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.केवळ विदर्भ-महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नाट्यकर्मींच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. दिल्लीपासून ते कोलकात्यापर्यंत एलकुंचवार यांचा चाहता वर्ग आहे. त्यांनी उद्घाटक होण्याचे मान्य केल्याने त्यांच्या देशातील समस्त चाहत्यांना आनंद झाला आहे, अशी माहिती नाट्य परिषदेकडून मिळाली आहे.