महेश भट्ट यांना धमकी देणाऱ्यास कोठडी
By Admin | Updated: March 5, 2017 03:39 IST2017-03-05T03:39:14+5:302017-03-05T03:39:14+5:30
चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या लखनऊमधून संदीप साहू (२४) ला शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १० तारखेपर्यंत

महेश भट्ट यांना धमकी देणाऱ्यास कोठडी
मुंबई : चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या लखनऊमधून संदीप साहू (२४) ला शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आपल्या विरोधात तब्बल गंभीर ७० गुन्हे दाखल असून पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे सांगून त्याने भट्ट यांना धमकावले होते. त्याच्या विरोधात दाखल या गुन्ह्यांबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
मुळचा लखनऊचा रहिवासी असलेल्या साहूने २६ फेब्रुवारी रोजी आपण एका गँगचे लीडर असल्याचे सांगत महेश भट्ट यांना फोन करून त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास त्यांची पत्नी सोनी राझदान आणि मुलगी, अभिनेत्री आलिया भट्ट यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला अटक होताच शुक्रवारी रात्री त्याला मुंबईत आणण्यात आले. शनिवारी दुपारी साहूला किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले.
त्यावेळी ‘आपल्या विरोधात तब्बल गंभीर ७० गुन्हे दाखल असून पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे सांगून त्याने भट्ट यांना धमकावले होते. त्याच्या विरोधात दाखल या गुन्ह्यांची माहीतीसुद्धा घेणे बाकी आहे. तसेच साहू याने आपण बबलू श्रीवास्तव टोळीचा सदस्य असल्याचेही भट्ट यांना फोनवरून सांगितले होते. याचाही तपास करणे बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे साहूच्या कोठडीची मागणी केली. (प्रतिनिधी)