Join us  

'वीज घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना 'महावितरण'चा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 2:58 PM

१८ तारखेला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात.

मुंबई: मनसेच्या सभेच्यावेळी वीज घालवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना तुडवा, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानावर 'महावितरण'कडून पत्रक काढून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, असे महावितरणने म्हटले आहे. मुळात महावितरणने आजवर कधीही आणि कुठल्याही राजकीय सभेच्यावेळी जाणीवपूर्वक वीजपुरवठा बंद केलेला नसून याबाबत राज ठाकरेंचे हे चिथावणीखोर वक्तव्य अत्यंत खेदजनक असल्याचे महावितरणने आपल्या पत्रकात म्हटले आहे.मुंबईत शुक्रवारी मनसेच्या 12 व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत मी माझं म्हणणं मांडेन, असे सांगितले होते. तसेच १८ तारखेला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. पण, यावेळी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवा. सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. कारण, इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवा, असे आदेश राज यांनी कार्यकर्त्यांनी दिले होते.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेगुढी पाडवा