महावीर जयंती दिनीच जैन मंदिरात चोरी

By Admin | Updated: April 2, 2015 23:01 IST2015-04-02T23:01:33+5:302015-04-02T23:01:33+5:30

जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकार वर्धमान महावीरांनी मानव जातीला अस्तेय म्हणजेच चोरी करू नये हा मंत्र शिकवला. मात्र,

The Mahavir Jayanti stole at the Jain temple on the day | महावीर जयंती दिनीच जैन मंदिरात चोरी

महावीर जयंती दिनीच जैन मंदिरात चोरी

डहाणू ग्रामीण : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकार वर्धमान महावीरांनी मानव जातीला अस्तेय म्हणजेच चोरी करू नये हा मंत्र शिकवला. मात्र, याच पवित्र दिवशी डहाणूतील एका जैन मंदिरात चोरी झाली असून भुरट्यांनी ८० हजाराचा ऐवज लंपास केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार चोरट्यांनी दोन चांदीचे मुकुट, दोन पंचधातूंच्या मूूर्ती, दानपेटीतील रोकड अशी एकूण ८० हजाराची लूट केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The Mahavir Jayanti stole at the Jain temple on the day