Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महावीर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:17 IST

ओझर-अहिंसा परमो धर्म, महावीर स्वामी अंतर्यामी महावीर भगवान की जय अशा विविध घोषणांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ओझर-अहिंसा परमो धर्म, महावीर स्वामी अंतर्यामी महावीर भगवान की जय अशा विविध घोषणांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपळगाव बसवंत येथे उंटावरून मिरवणूक काढण्यात आली. ओझर येथे जैन बांधवांनी महावीर जयंती साजरी केली.सकाळी नऊ वाजता जैन स्थानक येथून शोभयात्रेला सुरवात झाली.सर्वात पुढे महिला त्यानंतर रथ व शेवटी पुरु ष बांधव असे यात्रेचे स्वरूप होते.मेनरोड,तांबट लेन,गायकवाड लेन तानाजी चौक मारु ती वेस येथून पुन्हा जैन स्थानक येथे समारोप झाला.यानंतर विविध मान्यवरांनी व समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी राजेंद्र जैन, सुवालाल बाफना, अशोक कासलीवाल, रिकबचंद कासलीवाल, डॉ.गुलाबचंद कासलीवाल, सुनील भंडारी, महेंद्र बेदमुथा, शांतीलाल पारख, नंदलाल चोपडा, हरीश जैन,, सुनील बाफणा, धनजी चोपडा, सुरेश कासलीवाल, नीतीन गांधी, सचिन गांधी, पुनमचंद कोचर, सुवालाल बाफणा, संजय गंगवाल, दिनेश सवाने, प्रशांत महाजन, रु पेश बाफणा, तसेच माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष संजय सारडा, विनोद चांडक, विकास भट्टड, योगेश जाजू व समस्त जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :नाशिक