Join us

महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 'वर्षा'वर झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली.

मुंबई : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमधील आजारांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत १,३५६ आजारांवर उपचाराची सोय होती. आता २,३९९ अजारांवर उपचार होतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 'वर्षा'वर झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली.

Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या दोन्ही योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयांचे मॅपिंग करावे. तालुक्यात ३० खाटांचे नसल्यास अशा ठिकाणी उपलब्ध रुग्णालयात योजनेचा लाभ देऊन देयकाच्या अदागीची व्यवस्था करावी., असे मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांना त्यांची देयके वेळेत देण्यात यावेत.

योजनेतील उपचार, रुग्णालये, लाभ यांची माहिती मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप तयार करावे. त्यामध्ये चॅटबॉटद्वारे सर्व माहिती मिळण्याची व्यवस्था करावी.

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करता येऊ शकतील अशा २५ उपचारांचा योजनेत समावेश

उपचारांच्या दर निश्चितीला मान्यता

रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्र धारक रुग्णालयांना आणि आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अधिकची रक्कम देण्यात येणार.

१,३५६

व्याधींवर आगोदर उपचार 

२,३९९

व्याधींवर आता उपचार

पाच लाखांपेक्षा जास्त खर्चासाठी कॉर्पस निधी

सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे योजनेत समाविष्ट