Join us  

महाराष्ट्राची ‘श्रीमंती’ वाढली; 33 धनकुबेरांची भर, दिल्ली दुसऱ्या नंबरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 7:20 AM

महाराष्ट्रानंतर दिल्ली आणि कर्नाटकचा नंबर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंतांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रातील श्रीमंतांचा आकडा ३३५ वर पोहोचला आहे. २०२१ च्या तुलनेत राज्यातील श्रीमंतांच्या आकड्यात ३३ जणांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली आणि कर्नाटकमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात. दिल्लीत १८५, तर कर्नाटकात ९४ श्रीमंत आहेत. ‘आयआयएफएल’ हुरून इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ही माहिती समोर आली आहे.

किशोरवयीन मुलाचा यादीत प्रवेशयादीतील सर्वात तरुण १९-वर्षीय कैवल्य वोहरा आहे. त्याने ‘झेप्टो’ची स्थापना केली. दहा वर्षांपूर्वी यादीतील सर्वात तरुण ३७ वर्षांचा होता आणि आज १९ वर्षांचा आहे. सॉफ्टवेअर कंपनी काँन्फ्ल्यूअंटच्या सह-संस्थापक, नेहा नारखेडे (३७) तरुण महिला स्वयंनिर्मित उद्योजक आहेत. 

राज्यांची यादी     राज्य    श्रीमंतांची     २०१८        संख्या    मधील    १    महाराष्ट्र    ३३५ (३३)    २७१ २    दिल्ली    १८५ (१८)    १६३ ३    कर्नाटक    ९४ (४)    ७३ ४    गुजरात    ८६ (११)    ६० ५    तामिळनाडू    ७९ (१४)    ४५ ६    तेलंगणा     ७० (७)    ४९ ७    प. बंगाल     ३८(१)    २८ ८    हरयाणा    २९ (४)     ११ ९    उत्तर प्रदेश    २५ (३)    १५ १०    राजस्थान    १६(०)    ७

पुणे टॉप १० मध्ये :

सर्वाधिक श्रीमंत असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याने पहिल्या १० मध्ये स्थान पटकावले असून ८ व्या क्रमांकावर आहे. पुण्यात ३४ श्रीमंत राहतात. गेल्या वर्षीपेक्षा ३ जणांची यादीत भर पडली आहे. सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.  

शहरांमध्येही मुंबईला पसंती :

देशातील शहरांचा विचार करायचा झाल्यासही अतिश्रीमंतांची मुंबईला पहिली पसंती आहे. एकट्या मुंबईत २८३ श्रीमंत राहतात. गेल्या वर्षीपेक्षा यात २८ जणांची वाढ झाली. २०१८ मध्ये हाच आकडा २३३ होता. मुंबईनंतर या यादीत नवी दिल्ली आणि बंगळुरूचा क्रमांक येतो. दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे १८५ आणि ८९ श्रीमंत राहतात. मुकेश अंबानी मुंबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रकर्नाटक