Join us  

इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी महाराष्ट्राचे सुपुत्र अतीश दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:17 AM

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान : भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून जागतिक ओळख

नागपूर : महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतीश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ५६ वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्रेणीने नोव्हेंबरपासून या पदाची पाच वर्षांसाठी धुरा सांभाळणार आहेत.

दाभोलकर हे साताऱ्याचे. त्यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे गेले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे काका होते व वडील श्रीपाद दाभोलकर यांनीदेखील ‘प्रयोग परिवार’च्या माध्यमातून शेतीकऱ्यांमध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे कार्य केले आहे. ‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून डॉ. अतीश दाभोलकर यांची ख्याती आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि ‘कॅलटेक’ येथे (पान ७ वर)काय आहे ‘आयसीटीपी’ ?नोबेल पुरस्कार विजेते अब्दुस सलाम यांनी १९६४ मध्ये ‘आयसीटीपी’ची स्थापना केली. मूलभूत संशोधनाबरोबर जगभर वैज्ञानिक क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नांंमागील ‘आयसीटीपी’ ही एक प्रेरक शक्ती आहे. दरवर्षी जगभरातील ६००० हून अधिक वैज्ञानिक वेगवेगळ्या पातळीवरील वैज्ञानिक संशोधनासाठी तेथे भेट देतात.‘आयसीटीपी’च्या कार्यकलापांचा लाभ घेणाºया १८० देशांपैकी एक देश भारत आहे. इटालियन सरकार, आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्था (आयएईए), आणि ‘युनेस्को’ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार कार्यरत असणारी ‘आयसीटीपी’ ही युनेस्कोची प्रथम श्रेणीची संस्था आहे.चक्क हॉकिंग आले होते भेटायलाजागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ.स्टीफन हॉकिंग हेदेखील डॉ.अतिश दाभोलकर यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. १९९५ साली डॉ.दाभोलकर यांनी ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी हॉकिंग यांनी कॅलिफोर्नियात चक्क ‘व्हीलचेअर’वरुन दाभोलकर यांच्या कार्यालयात येऊन त्यांची भेट घेतली होती. डॉ. दाभोलकर यांच्या प्रयत्नांतून डॉ. स्टीफन हॉकिंग २००१ साली मुंबईत झालेल्या ‘स्ट्रींग’ला उपस्थित झाले होते. यावेळी त्यांचे सायन येथील षण्मुखानंद सभागृहात व्याख्यानदेखील झाले होते.

टॅग्स :सातारा परिसरइटली