Join us  

Vidhan Sabha 2019 : मतदार जागृतीसाठी हॅशटॅग, माधुरी दीक्षित अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 2:58 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीला अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, म्हणून प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्क साइट्सचा वापर करत आहे. टिष्ट्वटरचाही यासाठी मोठा उपयोग करून घेतला जात आहे. याशिवाय अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह विविध क्षेत्रांतील सदिच्छादूतांकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीत राज्यात ५०.६७ टक्के तर २०१४च्या निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ४ आॅक्टोबरपर्यंत मतदार यादीत नावनोंदणी करता येणार आहे.विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास, सी व्हिजिल या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे.अभिनेत्री माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रिटींनीही मतदारांनी मतदान करावे, यासाठी त्यांना आवाहन करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचीही मतदारांना माहिती देण्यात येत आहे.आॅनलाइन मतदार नोंदणीकिंवा दुरुस्ती शक्यमतदार यादीत नावात दुरुस्ती किंवा नाव नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ँ३३स्र://ल्ल५२स्र.्रल्ल या वेबसाइटवर जाऊन आॅनलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदविता येते किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्तीदेखील करता येते.हॅशटॅग#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#चलामतदानकरूया#महाराष्ट्रविधानसभाचुनाव#विधानसभाचुनाव2019घोषवाक्यदेणार मी #मत देणार, वेळात वेळ काढून मत देणार!माझ्या महाराष्ट्रासाठी मत देणारघोषवाक्यउत्सव आहे तुमचा-आमचा, लोकशाहीचा.हक्क बजावू आपण सारे मतदानाचा!भारतीय लोकशाहीचा अभिमान, चला करू मतदान.मतदानाची खात्री करण्यासाठी आता ईव्हिएमबरोबरव्हीव्हीपॅट मशीन.मतदान केल्यानंतर आपल्या मताची करता येणार खात्री.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबई