Join us  

Vidhan sabha 2019 : गटबाजीच्या राजकारणाने दिंडोशीत राष्ट्रवादीला पोखरले! कार्यकर्त्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:47 AM

दिंडोशी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यासाठी कुरघोडीचे राजकारण आणि अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी प्रचाराचा सपाटा लावला असतानाच, दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यासाठी कुरघोडीचे राजकारण आणि अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.विधान परिषदेवर आमदार असलेल्या विद्या चव्हाण यांनी आपली पक्षनिष्ठा आणि अनुभवाच्या जोरावर दिंडोशीतून उमेदवारीचा दावा ठोकला आहे. तर दिंडोशीचे माजी नगरसेवक अजित रावराणे यांनी देखील उमेदवारीसाठी कंबरकसली आहे. मात्र, या दोघांतूनही विस्तव जात नाही, असे कार्यकर्ते सांगतात.गेल्या अनेक वर्षांपासून अजित रावराणे आणि विद्या चव्हाण यांच्यामध्ये सुरू असलेला हा वाद मिटविण्यासाठी दिंडोशीतील सक्रिय कार्यकर्त्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र. पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष नदिल्याने गटबाजी उफाळून आली आहे.हा वाद मिटावा, यासाठी दिंडोशीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच दिंडोशीचा उमेदवार जाहीर करू असे, आश्वासन दिले होते. परंतु, उमेदवार निवडीच्या चर्चेत ना कार्यकर्ते, ना पदाधिकाºयांचे मत विचारात घेतले गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचीही भेट घेत कार्यकर्त्यांनी हा वाद त्यांच्या कानावर घातला. मात्र, त्यांच्याकडूनही अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाहीत. हा विभाग राष्ट्रवादीसाठी पोषक असून पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.‘तिसºयालाच उमेदवारी द्या’२०१४ च्या विधासभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. त्या वेळी राष्ट्रवादीतून अजित रावराणे यांना ८,५५० मते मिळाली होती, तर काँग्रेसमधून राजहंस सिंग यांना ३६,७४९ मते मिळाली होती. यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. जर एकत्र लढले तर हा विभाग राष्ट्रवादीकडे जाईल. त्यामुळे आघाडीच्या ताकदीच्या जोरावर या मतदारसंघात युतीला जोरदार टक्कर मिळू शकते. चव्हाण आणि रावराणे हे दोघेही एकत्र येण्यास तयार नसतील, तर तिसºयाच उमेदवाराला येथून उमेदवारी द्यावी, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :दिंडोशीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019