Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक संपावर, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 11:04 IST

महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचे सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत. ही कंपनी मेट्रो, विमानतळ यांसारख्या अनेक ठिकाणी सुरक्षा पुरवते. यामुळे राज्यातील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. पगारवाढ आणि नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी सुरक्षारक्षकांनी हा संप पुकारला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक संपावर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यातपगारवाढ, नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी पुकारला संप

मुंबई, दि. 19 - महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचे सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत. ही कंपनी मेट्रो, विमानतळ यांसारख्या अनेक ठिकाणी सुरक्षा पुरवते. यामुळे राज्यातील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. पगारवाढ आणि नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी सुरक्षारक्षकांनी हा संप पुकारला आहे.

मुंबई मेट्रोतील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे मेट्रो प्रशासनाने सध्या खासगी सुरक्षा पुरवली आहे. मात्र आता घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काऊन्टर आणि तपासणी काऊन्टरवर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत 'महाराष्ट्र सुरक्षा बल' ही कंपनी येते. कंत्राटी स्वरुपात याचं काम चालते. मात्र मंगळावीर अचानक सकाळच्या शिफ्टमधील सुरक्षारक्षक संपावर गेल्यानं अनेक ठिकाणी सुरक्षाविषयक अडचण निर्माण झाली आहे. मेट्रो, एअरपोर्ट, टोल नाका, टाटा हॉस्पिटल, मोनो रेल याचप्रमाणे राज्यातील अनेक देवस्थानांना ही कंपनी सुरक्षा पुरवते.