Join us

जोगेश्वरीत आदित्य ठाकरेंचा रोड शो

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 13, 2024 18:12 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन उद्या दि,१४ मे रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई -  महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन उद्या दि,१४ मे रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या रोड शोची सुरवात जोगेश्वरी पूर्व शिवटेकडी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथून होवून समर्थ नगर, आनंदनगर येथे समाप्त होईल. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर, विभागाप्रमुख व शिवसेना नेते सुनिल प्रभू, खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी नगरसेवक बाळ नर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, युवा सेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू, रुपेश कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पुरुष व म‍हिला पदाधिकारी आणि विभागातील नागरीक मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तर पश्चिमलोकसभा निवडणूक २०२४