Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 06:02 IST

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन दिवस राज्यभरात गारठा कायम राहील.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून,  अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन दिवस राज्यभरात गारठा कायम राहील.

मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !

थंडगार वाऱ्यांमुळे हुडहुडी

हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले, उत्तर भारतातून दक्षिणेकडे गार वारे वाहत आहे. या बोचऱ्या वाऱ्यांमुळे  किमान तापमान घसरले आहे. गुरुवारी किमान तापमान आणखी घसरेल.

अहिल्यानगर     ७.५

छ. संभाजी नगर १०.८

बीड    ९

डहाणू   १६.१

जळगाव ८

कोल्हापूर १४.६

महाबळेश्वर      ११.६

मालेगाव ९.४

मुंबई   १६.७

नांदेड   १०.६

नंदुरबार १२.७

नाशिक  ८.१

धाराशिव १२.६

पालघर  १२.८

परभणी  १०.५

सांगली  १३

सातारा  ११.६

ठाणे    २१

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Shivers: Mercury Plummets to 10 Degrees, Cold Wave Grips

Web Summary : Maharashtra experiences severe cold as temperatures drop significantly, reaching 10 degrees Celsius in many cities. The weather department forecasts further temperature dips in the next three days. Mumbai recorded a minimum temperature of 16 degrees Celsius, with cold winds contributing to the chill.