Join us  

महाराष्ट्र गारठला; नाशिक ७.९, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट; अकोल्यात वृद्धाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 6:28 AM

विदर्भात तापमानाचा पारा १ ते ५ अंश सेल्सिअसने घसरला आहे़ मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसची घट आहे़

मुंबई/पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने महाराष्ट्र गारठला आहे. बुधवारी सर्वात कमी तापमान नाशिक येथे ७.९ अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात तापमानाचा पारा १ ते ५ अंश सेल्सिअसने घसरला आहे़ मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसची घट आहे़ धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात थंडीचा कडाका जास्त आहे. देशात सर्वात कमी किमान तापमान पूर्व राजस्थानातील सिकर येथे ०़५ अंश सेल्सिअस होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातेतही थंडीचा कडाका वाढला आहे. नांदेडमध्ये ८़५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहाटे सर्वत्र धुके असल्यामुळे नांदेड विभागातून धावणाºया रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला़

अकोला बसस्थानक परिसरात ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेहआढळला असून तो थंडीचा बळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)नाशिक ७़९, पुणे ९़३, जळगाव ९़४, कोल्हापूर १४़५, महाबळेश्वर १०़१़, सांगली १३़१, सातारा १३़२, सोलापूर ११़६, मुंबई २०़२, सांताक्रुझ १७़४, अलिबाग १७, रत्नागिरी १८़८, पणजी १९़१, उस्मानाबाद १२़४, परभणी ११, अकोला १२़१, अमरावती १०़६, बुलढाणा १०़४, ब्रम्हपुरी १०़४, चंद्रपूर १०़४, गोंदिया ११, नागपूर ९़६, वर्धा १०़५, यवतमाळ १०़२़

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशननाशिक