Join us  

मुंबईमध्ये चार मजली इमारतीला लागली भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 10:28 AM

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये अग्निशमन दलाने तीन लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर इमारतीत काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये प्रसिद्ध गिरगाव चौपाटी येथील चार मजली इमारतीला शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये अग्निशमन दलाने तीन लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर इमारतीत काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. गोमती भवन इमारतीला लेव्हल २ ची आग लागली होती. अग्निशमन दलाच्या १० गाड्या पोहोचल्या होत्या. ही आग तिसरी आणि चौथ्या मजल्यावर पसरली होती. 

रांगनेकर रोडवरील इमारतीला रात्री साडे नऊ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. यानंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाहीय, असे पोलिसांनी सांगितले. इमारतीतून दोन जणांचे जळालेले मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. दोन्ही मृतदेह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सापडले आहेत. एक बेडरूममध्ये आणि दुसरा बाथरूममध्ये होता, असे पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :आग