Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:02 AM2019-10-11T05:02:46+5:302019-10-11T05:03:41+5:30

विलेपार्ले येथे २००९ साली विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात मुख्य सामना रंगला होता.

Maharashtra Election 2019: Will the struggle against the Rane continue? Uddhav Thackeray's suggestive answer | Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, चांदिवली आणि घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांविरोधात भल्याभल्यांनी दंड थोपटले असून, अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर येथील राजकीय प्रचार आणि प्रसारास आता धार चढली आहे. विशेषत: या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मनसेने मैदानात उतरविलेले उमेदवार आणि गुरुवारी कलिना, विलेपार्ले आणि वांद्रे या तिन्ही विधानसभेतील उमेदवारांकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळे येथे चढाओढीच्या प्रचाराला आता ‘राज’कारणाचे रंग चढू लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच बुधवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास आयकर विभागाने चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर छापा मारला; आणि राजकीय घडामोडी नाट्यमयरीत्या घडू लागल्या. सद्य:स्थितीमध्ये विलेपार्ल्यात भाजपचे पराग अळवणी, काँग्रेसच्या जयंती सिरोया, मनसेच्या जुईली शेंडे यांच्यात प्रचार आणि प्रसारासाठीची जोरदार चुरस रंगली. चांदिवलीत काँग्रेसचे नसीम खान, शिवसेनेचे दिलीप लांडे, मनसेचे सुमित बारस्कर, आपचे सिराज खान यांच्या प्रचारात रंगत आली. घाटकोपर पश्चिममध्ये काँग्रेसचे आनंद शुक्ला, मनसेचे गणेश चुक्कल आणि भाजपचे राम कदम यांच्यात जोरदार चुरस रंगली.
मनसे फॅक्टर
विलेपार्ले येथे २००९ साली विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात मुख्य सामना रंगला होता. कृष्णा हेगडे यांना या वेळी ४४ हजार ३३८ मते मिळाली होती. विनायक राऊत यांना ४२ हजार ६३४ मते मिळाली होती. अवघ्या १ हजार ७०४ मतांनी हेगडे यांचा विजय तर राऊत यांचा पराभव झाला होता. मनसे फॅक्टर या वेळी ठिकठिकाणी महत्त्वाचा ठरला होता. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात मनसेने शिरीष पारकर यांना उमेदवारी दिली होती. पारकर यांना येथून ३५ हजार १५६ मते मिळाली होती. मनसेच्या उमेदवारामुळे शिवसेनेच्या उमेदवाराची मते कमी झाली होती.
मनसे आणि सेनेच्या मतांची बेरीज
चांदिवलीमध्ये २००९ आणि २०१४ अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारास धूळ चारली आहे. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरीदेखील काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या पुढे हा आकडा जात नाही. परिणामी, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनसेतून भाजपकडे
घाटकोपर पश्चिममध्ये २००९ सालच्या विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राम कदम मैदानात उतरले होते. तर भाजपतर्फे पूनम महाजन मैदानात उतरल्या होत्या. पूनम यांचा पराभव तर कदम विजयी झाले. २०१४ साली कदम यांनी विधानसभेची निवडणूक भाजपतर्फे येथेच लढली. शिवसेनेने सुधीर मोरे यांना उमेदवारी दिली. या वेळीही कदम यांचा विजय झाला होता.

शिवसेना-मनसे-शिवसेना
चांदिवलीचा विचार करता दिलीप लांडे आता शिवसेनेत आहेत. लांडे एके काळी मनसेत होते. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते. लांडे यांनी २००९ साली मनसेतून चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे नसीम खान यांच्या विरोधात दंड थोपटले होते. लांडे यांना ४८ हजार ९०१ मते मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी घाटकोपर पश्चिममधून नशीब आजमावले. तेव्हाही ते मनसेतच होते. येथे त्यांना १७ हजार २०७ मते मिळाली होती. त्यानंतर काही वर्षांतच लांडे पुन्हा शिवसेनेत दाखल झाले; आणि आता ते चांदिवलीमधून नसीम खान यांच्याविरोधात लढत आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019: Will the struggle against the Rane continue? Uddhav Thackeray's suggestive answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.