Join us  

Maharashtra Election 2019 : ‘वंचित’च्या कार्यालयावर आयकरचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 5:48 AM

वंचितच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील गरीब नवाज कॉर्पोरेशन येथील कार्यालयावर हा छापा मारण्यात आला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच बुधवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास आयकर विभागाने चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर छापा मारला. या कारवाईत आयकर विभागाला १ हजार १०० रुपये रोख रक्कम आढळून आली.

वंचितच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील गरीब नवाज कॉर्पोरेशन येथील कार्यालयावर हा छापा मारण्यात आला. छापा मारण्यात आला तेव्हा कार्यालयात पाच जण होते. दिवसभर येथे चौकशी सुरू होती. या कारवाईदरम्यान आयकर विभागाला १ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. दिवसभर घटनास्थळी चौकशी सुरू होती, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस डॉ. ए.आर. अंजारिया आणि चांदिवली येथील उमेदवार अबुल हसन खान यांनी दिली. कारवाई म्हणजे अन्याय असून, भाजप-शिवसेना ही कारवाई सूडबुद्धीने करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019