Join us  

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा खर्चही उमेदवाराच्या हिशेबात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:14 AM

उमेदवाराच्या खात्यावरील ग्राफिकचा वापर केलेली छायाचित्रे व व्हिडीओप्रमाणे दररोज खर्च निश्चित करून त्याची नोंद केली जात आहे.

- खलील गिरकरमुंबई : फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, हॅलो, व्हॉट्सअप, यूट्युब अशा विविध सोशल मीडियावर प्रचार करून तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उमेदवार अवलंबवत आहेत. मात्र, उमेदवारांच्या एकूण एक पोस्टवर निवडणूक आयोगाची नजर आहे. आयोगाकडे उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेल्या सोशल मीडियाच्या खात्यावरील प्रत्येक पोस्ट निवडणूक आयोग पडताळून पाहत असून, एखादी आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्वरित त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात त्याची नोंद केली जात आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चासोबत या खर्चाची माहिती पडताळून पाहिली जाणार असून, जर उमेदवारांनी याबाबत माहिती लपविल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. उमेदवारांच्या आॅनलाइन प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे १२ जणांचे पथक दोन शिफ्टमध्ये मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे.उमेदवारांनी फेसबुक, टिष्ट्वटरवर अपलोड केलेल्या छायाचित्रामध्ये ग्राफिकचा वापर केलेला असेल, तर आयोगाकडून त्यासाठी प्रति छायाचित्रासाठी ३०० रुपये आकारले जात आहेत. दोन मिनिटांच्या व्हिडीओसाठी १,७०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. दोन मिनिटांपुढील प्रत्येक सेकंदासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चात याचा समावेश करण्यात येत असून, प्रत्येक दिवशी याबाबतची माहिती निवडणूक खर्च अधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याची माहिती या कक्षाचे समन्वयक अधिकारी आनंद संख्ये यांनी दिली.उमेदवाराच्या खात्यावरील ग्राफिकचा वापर केलेली छायाचित्रे व व्हिडीओप्रमाणे दररोज खर्च निश्चित करून त्याची नोंद केली जात आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी २८ लाख रुपयांची मर्यादा आयोगाने निश्चित करून दिलेला त्यामध्ये या सोशल मीडियाच्या खर्चाला अंतर्भूत करण्यात येणार आहे. उमेदवार जेव्हा खर्चाचा तपशील देईल, त्यावेळी त्यामध्ये सोशल मीडियाचा खर्च पडताळून पाहिला जाणार आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात २४४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १२८ जणांनी आपल्या फेसबुक, टिष्ट्वटर खात्याविषयी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे, तर उर्वरित ११६ जणांनी याबाबत माहिती दिलेली नाही. ज्या उमेदवारांनी सोशल मीडिया खात्याबाबत माहिती दिलेली नाही, त्यांच्याबाबत संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांना कळविण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध सरकारी संकेतस्थळांची पाहणी करून, त्यावरील राजकीय नेत्यांची छायाचित्रे हटविण्यात आली.नामांकन दाखल करण्यापूर्वी विविध पक्षांच्या संकेतस्थळांचे निरीक्षण करण्यात आले. फेसबुकवरील व्हिडीओचे रेकॉर्डिंग करून त्याची सीडी तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. मतदारांमध्ये नव मतदारांचे प्रमाण मोठे असल्याने, सोशल मीडियावरील प्रचाराला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रतिज्ञापत्रात नोंदविलेल्या खात्याचेच निरीक्षणउमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिलेल्या फेसबुक व इतर सोशल मीडिया खात्याचेच निरीक्षण सध्या केले जात आहे. एखाद्या उमेदवाराने माहिती दिलेल्या सोशल मीडिया व्यतिरिक्त इतर खात्याद्वारे प्रचार सुरू असल्यास, त्याबाबत तक्रार आली, तरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019विधानसभा निवडणूक 2019